Posts

Showing posts from July, 2020

टोळधाड आली रानगटांची, वाताहत सुरू झाली महाराष्ट्राची

तो काळ महाराष्ट्राच्या चढत्या वाढत्या भाग्याचा होता शालिवाहन शिलाहार चालुक्य कदम अशा अनेक राज वतीने महाराष्ट्र राज्य केले पण प्रत्येक राजवटीत महाराष्ट्राचे पाऊल पुढे पडत राहिले देवगिरी या राजधानीतून या बहुतांश मराठी भूमीवर राज्य कृष्णाच्या यादवकाळातील राजांचा राजवती ही अशाच लोककल्याणकारी होत्या हे राजे जरी वैभव संपन्न होते तरी ते विलासी नव्हते प्रजा पालन चे कर्तव्य मानणारे होते त्यांच्या प्रस्तावना ने धर्मशास्त्र शिल्पशास्त्र वैद्यक शास्त्र संगीत शास्त्र साहित्य अशा विविध क्षेत्रात मोलाची भर टाकणारी नररत्ने जळून गेले आणि व्यापार पुदिन यांना तेजी आली म्हणूनच मूळची दंडकारण्य या नावाने संबोधली जाणारी ही भूमी महाराष्ट्र या नावाने ओळखले जाऊ लागले देवगिरीच्या यादव कुली राजा रामचंद्राच्या रामदेवरा यांच्या कार्यक्रम तर महाराष्ट्राचे महान पण शिगेला पोहोचले भीमा को कृष्णा गोदावरी 

तानाजी का तान्हाजी मालुसरे? योग्य माहिती आणि संदर्भ मिळेल का?

Image
छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंह ; तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरच्या तहात म्हणजेच मिर्जाराजे जयसिंगासोबत झालेल्या तहात जेवढे किल्ले मुघलांना द्यावे लागले त्यापैकी एक होता, किल्ले कोंढाणा. माँसाहेब जिजाऊंना सर्वात प्रिय असणारा हा गड होता. मिर्जाराजे जयसिंगा बरोबर झालेल्या तहामुळे हा किल्ला माँसाहेबांना सोडून यावा लागला. या तहात ठरल्यानुसार आणि मिर्जा राजे जयसिंग यांच्या खास आग्रहा खातर छत्रपती शिवाजी महाराज आग्राला बादशाहच्या भेटीस जाण्यास राजी झाले होते. कोंढाणा किल्ल्यावर आता मुघलांच्या फौजा होत्या, मिर्जाराजे जयसिंग यांनी नेमलेला त्यांचा सुभेदार उदयभान होता. हा मूळचा राजपूत, त्याचं मूळ नाव उदयसिंह राठोड. मुघलांची चाकरी करत असताना त्याने आपला हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला होता. या उदयभान्यान कोंढाणा किल्ल्यावर जणान खाना सुरू केला होता. जिजाऊ माँसाहेबांना ही गोष्ट खपत नव्हती. त्यावेळी जिजाऊ माँसाहेब राजगडावर होत्या. राजे स्वराज्याच्या पहाणीवर गेले होते. जिजाऊ माँसाहेबांनी महादेव नावाच्या रामोशी मावळ्याला बोलावले आणि त्याला सांगितले की, “छत्रपती शिवाजी महारा...

असे काही महान मराठा योद्धे कोण ज्यांचे कार्य महान होते पण इतिहासात त्यांचे नाव झाले नाही?

Image
असे काही महान मराठा योद्धे कोण ज्यांचे कार्य महान होते पण इतिहासात त्यांचे नाव झाले नाही? शिवाजी महाराजांचे बरोबर संभाजी महाराज ,राजाराम महाराज ,सर्व पेशवे ,बाजीप्रभू ,तान्हाजी, येसाजी ,नेताजी मुरारबाजी कान्होजी ,प्रतापराव, हंबीरराव आणि इतर यांचे आपण कौतुक ऐकतो पण खालील लोकांनी पण तेवढीच तोलामोलाची कामगिरी केली ०१.खंडो बल्लाळ स्वतःच्या वडिलांना आणि भावाला शंभू महाराजांनी हत्ती खाली देऊन मारले तरी सुद्धा खंडो बल्लाळ ने स्वतःला स्वराज्य साठी वाहून घेतले.होता खंडो म्हणून वाचला शंभो हि म्हण ज्याच्यामुळे समाजात रूढ झाली त्या स्वामी भक्त खंडो बल्लाळ चिटणीस मनापासून मुजरा त्यांनी शंभू महाराजांना गोव्या मध्ये म्हापसा जवळ खाडी ओलांडताना बुडताना वाचवले. संगमेश्वरी युद्ध वेळी जेंव्हा संभाजी महाराजांना मुघलांनी पकडले तेंव्हा येसूबाईंना रायरी ला सुखरूप परत आणून दिले. राजाराम महाराज जिंजी मध्ये अडकलेले असताना गणोजी शिर्के ला आपले वतन दिले आणि गणोजी शिर्के ला मदत करायला भाग पडले आणि राजाराम महाराज जिंजी तुन सुखरूप निघाले.स्वतःचे वतन वर तुळशीपत्र ठेवले. स्वतः ची आर्थिक परिस्थिती प्रचंड खराब झाली 0...

नरवीर तानाजी मालुसरे

             *नरवीर तानाजी मालुसरे*  *तानाजी हे* शिवाजी महाराजांचे बालपणाचे सवंगडी होते. त्यांनी स्वराज्य *स्थापनेच्या जडणघडणीमध्ये* *त्यांचा* *अतिशय मोलाचा* *वाटा होता*  स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिली होती. जेव्हा तानाजींना *ही* जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते. त्यांनी ती तयारी अर्धवट सोडली. स्वराज्यासाठीचे आपले काम *प्राधान्याने* घेऊन ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले. *आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे* हे त्यांचे शब्द इतिहासात अजरामर झाले आहेत. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. कोंढाणा किल्यावरच्या *शत्रू सैन्याला*  कळू न देता किल्ला दिवसा चढणे कठीण होते. तानाजींनी गडाच्या मागच्या बाजूने आपल्या घोरपडीला वर पाठवले. तिच्या शेपटीला दोर बांधला होता. मावळे त्या दोरीला पकडून वर चढून गेले. अचानक हल्ला करून त्यानी तेथील सैन्याला कात्रीत पकडले. आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई क...

वीर राणोजी घोरपडे

वीर राणोजी घोरपडे   संताजी पुत्र राणोजी घोरपडे. मुघल पन्हाळ्याला थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ९ वर्षे वेढा घालून बसले होते पण किल्ला आणि किल्लेदार त्यांना काही दाद देत नव्हते. औरंगजेबाने आपले एकाहून एक सरस उमराव पन्हाळ्यावर रवाना केले होते पण या पैकी कुणीच पन्हाळा काबीज करू शकले नाहीत. किल्ल्यातून मराठे अनेक वेळेला मुघली छावणीवर रात्री-अपरात्री गनिमी हल्ला करीत आणि जमेल तेवढे शत्रूचे नुकसान करून पुन्हा गडावर पसार होत असत.  गडावरच्या मराठयांना बाहेरून सुद्धा मदत मिळत असे. धनाजी जाधवांच्या आणि हिंदुराव घोरपडेंच्या सैन्याने सुद्धा पन्हाळ्याच्या आसमंतातील मुघली फौजेला हैराण करून सोडले होते. पन्हाळ्याच्या आसमंतात अतुलनीय पराक्रम करणारा अजून एक वीर म्हणजे संताजी पुत्र राणोजी घोरपडे.  या युद्धात राणोजी घोरपडेनवर जबाबदारी होती ती मुघली रसद मारण्याची आणि त्यांनी ती चोख बजावली.  राणोजी घोरपडे शिपाईगिरित आपल्या वडलांच्या पुढेच होते असे काही इतिहासकार लिहितात.  १७०२ च्या सुमारास मुघली फौजेशी सामना करताना राणोजी घोरपडे धारातीर्थी पडले. ताराराणीने राणोजी घोरपडेंच्या विधवा पत्नीला...

वीर येसाजी कंक

!! वीर येसाजी कंक !! महाराजांनी दक्षिणेकडे कूच केली मोगल शाही संपवण्यासाठी त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी हात मिळवणी केली. गोवळकोंड्यात महाराजांचे जंगी स्वागत झालं. मुगल शाही, आदिलशाही, निजामशाही अश्या साऱ्या शह्यांच्या उरावर उभं राहून स्वराज्य निर्माण करणारा जाणता राजा आलाय म्हणून लोकांनी खूप गर्दी केली. महाराजांसोबत सरनोबत हंबीरराव मोहिते, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक इत्यादी निवडक मावळे होते या सगळ्यांनी महालात प्रवेश केला. गोवळकोंड्याचा कुतुबशहा महाराजांना म्हणतोय 'महाराज आपकी फौज देखकरं हमे बडी खुशी हुई लेकीन ताजूब की बात ये हे की आपकी फौज मे हमने हाथी नही देखा" यावर महाराज उत्तरले "आमच्या कडे पन्नास हजार हत्ती आहेत, म्हणजे आमचा एक एक मावळा हत्तीच्या ताकतीचं आहे" यावर कुतुबशहा म्हणतोय हत्तीच्या ताकतीचां माणूस कसं काय शक्य आणि असेल एखादा असा मावळा तर काय तो माझ्या हत्तिशी झुंज देईल. महाराज म्हणतायत का नाही यातील कोणताही मावळा निवडा तो तुमच्या हत्तीशी झुंज देईल. कुतुबशहा न प्रत्येक मावळ्यावर कुंचीतसी नजर फिरवली व येसाजी कडे बोट दाखवत विचारलं "क्या ये सिपा...

वीर शिवा काशिद

              !! *वीर शिवा काशिद*  !! हे शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करते वेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहचले.  हे शिवा काशीद हुबेहूब शिवाजी राजांसारखे दिसत असत. त्यांना पोशाखही शिवाजी महाराजांचा दिला होता. त्यामुळे सिद्दी जोहरच्या सैनिकांनी पालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवा काशिदांना, शिवाजी राजे समजून पकडले आणि सिद्दीकडे नेले.  मात्र, हे शिवाजी नाहीत असे कळताच जोहरने त्यांच्या पोटात तलवार खूपसली. ही घटना इ.स.१६६० मध्ये घडली. शिवा काशिदांनी शिवाजी महाराजांचा आणि स्वराज्याचा जीव वाचविला. नेबापूर (चव्हाण) पाटील यांच्या कल्पनेचा सन्मान म्हणून शिवाजी महाराजांनी "मानाची पायरी" भेट दिली.  "मानाची पायरी" हा एक मोठा आयताकृती कोरीव दगड आहे. तो अजूनही नेबापुरात आहे. !! जय शिवराय.. जय भवानी !!

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला.  या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर ते जलकुंभांनी शिवाजी महाराजांवर अभिषेक केला. त्यावेळी मंत्रोच्चारण आणि आसमंतात विविध सुरवाद्य निनादत होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. एक राजमुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि...