Posts

Showing posts from December, 2021

अदालत राजवाडा

Image
अदालत राजवाडा  अदालत राजवाडा पोस्टसांभार ::  Nilesh Zore | ऐतिहासिक वाडे व गढी | नुसते नाव जरी ऐकले की आठवतात छत्रपती थोरले शाहू महाराज , आठवतात याच वाड्यात बसून न्यायदान करणारे थोरले छत्रपती प्रतापसिंह महाराज, आठवतात त्या, करारीपणे वावरणाऱ्या पण तिक्याच प्रेमळपणे जनतेला राजवाड्याची द्वारे खुल्या करणाऱ्या रयतेला पुत्रवत प्रेम करणाऱ्या राजमाता छत्रपती सुमित्राराजे भोसले. छत्रपती थोरले शाहू महाराजांनी जेव्हा किल्ले अजिंक्यतारा राजधानी म्हणून कमीपडू लागल्या नंतर राजधानी शाहूनगर (सातारा शहर) वसवले तेव्हा प्रथम काही वास्तू बांधल्या. सन १७२०/२१ मधील काही पत्रांमध्ये तसे उल्लेख आढळतात. शाहूनगर अर्थात सातारा शहर हे सुनियोजित शहर. शहर वसवताना किल्ले अजिंक्यतारा च्या माचीवर अर्थात अर्ध्या डोंगरावर बालेकिल्ल्या बांधला. मी बालेकिल्ला या साठी म्हणतोय कारण आपण जर अध्यास केला आणि नीट निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की नगरपालिका भागा पासून ते समर्थ मंदिर चौक इथं पर्यंत राजकारभारा निगडित वास्तू किंवा तत्सम इमारती किंवा त्यांच्या खाणाखुणा दिसतात. पण या माचीच्या अगदी मध्यभागी तख्तवाडा( सध्या...

३० जानेवारी १७१५ सरखेल कान्होजींचा दरारा...

Image
३० जानेवारी १७१५ सरखेल कान्होजींचा दरारा...🚩  ३० जानेवारी १७१५ सरखेल कान्होजींचा दरारा... कान्होजी आंग्रे आणि शाहू राजे (पहिले) यांच्यामध्ये १६ नोव्हेंबर १७१३ रोजी तह झाला सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली... मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला असे समाधान शाहू छत्रपतींना झाले... १७१३ मध्ये कान्होजींना जो प्रदेश दिला गेला त्यात सिद्दीचा काही प्रदेश दिला गेला होता यामुळे कान्होजी आणि जंजिरेकर सिद्दी यांचे युद्ध झाले सिद्दीचे परिपत्य करण्यासाठी कान्होजींना इ.स १७१३ ते १७१५ पर्यंत खूप परिश्रम करावे लागले अखेर ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात..., १).“मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांन...

नाईक बावणे गढी - तांदुळजा

Image
नाईक बावणे गढी - तांदुळजा   Saurabh Madhuri Harihar Kulkarni पुढची मोहीम Pudhachi Mohim नाईक बावणे गढी - तांदुळजा लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील तांदुळजा या गावी जगजीवनराव नाईक बावणे यांची भव्य गढी आहे. साधारण २५० वर्षापूर्वी याचे बांधकाम झाले आहे. तांदुळजा हे गाव आंबेजोगाईपासून २५ कि.मी अंतरावर आहे. गढीचे भव्य प्रवेशद्वार त्याचे बुरूज आपले मन मोहून टाकतात. गढीत आत प्रवेश करतानाच आपल्याला गढीतून सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी केलेली दगडी पाईपलाईनची व्यवस्था पहायला मिळते. आतमध्ये नाईक बावणेंच्या वंशजांची घरे पहायला मिळतात. खूप खोल अशी आडवजा विहीर पहाता येते. साधारण १००-१५० फूट पूर्ण बांधलेला आड आहे तो. बुरूजावरून मारा करता येईल अशाप्रकारे जंग्या केलेल्या आहेत. गढीच्या बाहेर आण्णासाहेब नाईक बावणे यांचा वाडा आहे. आण्णासाहेब हे इ.स. १९४८ च्या मराठवाडा मुक्तीसंग्रामात सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यांच्या वाड्यात ब्रिटिशकालीन दुर्मिळ दुर्बीण, लहान ब्राँझची तोफ आहे तिचा बार दसराला करण्याची परंपरा आहे. अजून विवध वस्तू पहायला मिळतात. जुनी छायाचित्रे होती त्याचा संग्रह पहायल...

सुभेदार थोरले मल्हारराव होळकर

Image
सुभेदार थोरले मल्हारराव होळकर  उत्तरेत सुभेदार मल्हारराव होळकर [ KingMaker Of The North ] ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठा घोडदळ आणि शत्रूवर दबदबा निर्माण करून रणांगणात शत्रूचे केलेले हाल एका पत्रात सापडते - मराठा सरदारांनी उत्तरेत वेळोवेळी मोहिमा काढून आपले घोडदळ पूर्ण विचारपूर्वक नीतीने वापरले कारण मराठ्यांचा मुख्य कणा उत्तरेत घोडदळ हा होता. मधोसिंग आणि राजसिंग घोडचढा ह्यांच्या विरुद्ध सुभेदार मल्हारराव होळकर ह्यांचे युद्ध झाले. ह्या युद्धाची नोंदणी ३ मे, १७४७ दरम्यान चिंतो कृष्णा ह्यांनी केली. " राजश्री मल्हारजी राव होळकर आम्हास घेऊन निघाले. दरकूच मांगरोळ प्रांत हाडोती येथे गाठ झाली. जमादीलैवली चार घटका मागील दिवसापासून रात्र पावेतो गोळागोळीचे युद्ध झाले. उपरांत रात्री झाली तसेच घेरा घालून कंबरा बांधून घोडेवर चार प्रहार रात्री उभेच राहिलो. कछव्याची तमाम फौज बुडविली लुटून फस्त केली. तमाम हिंदुस्तान नक्ष बसला. सरकार पागेस शेसवाशे घोडे उंट आली. ( ह्यावरून मराठा फौजा किती हाल सहन करून शत्रूला धुळीस मिळवले हे कळून येतं.) सुभेदार थोरले मल्हारराव होळकर जयते ( खूब लढे मरहट्टे )

वडगावची लढाई मराठे व इंग्रज यांच्यामध्ये

Image
वडगावची लढाई मराठे व इंग्रज यांच्यामध्ये   वडगावची   लढाई मराठे व इंग्रज यांच्यामध्ये पुण्यापासून साधारणपणे ४० किमी दूर असलेल्या वडगाव या ठिकाणी झाली. याला पहिले मराठा-इंग्रज युद्ध म्हणूनसुद्धा ओळखले जाते. मराठे व इंग्रज यांच्यात एकूण तीन लढाया झाल्या. भारताच्या इतिहासात या तीनही लढाया अतिशय महत्त्वाच्या आहेत. या लढायांत मराठ्यांचे नेतृत्व तुकोजीराव होळकर व महादजी शिंदे यांनी केले. मराठ्यांनी या लढायांत शिस्त आधुनिक डावपेच यांचे प्रदर्शन करून इंग्रजांना परास्त केले व अखेरीस जेरीला आलेल्या इंग्रज फौजेचा वडगाव येथे पराभव केला. इंग्रजांना या पराभवामुळे मराठ्यांशी तह करावा लागला. परंतु इंग्रज गव्हर्नर यांनी हा तह नामंजूर करत युद्ध चालू ठेवले. माधवराव पेशवे यांच्या २७ व्या वर्षी क्षयरोगाने १७७२ ला झालेल्या अकाली निधनानंतर त्यांचे लहान भाऊ नारायणराव यांना पेशवेपदी बसवले गेले. पण माधवराव पेशवे यांच्या काळापासूनच त्यांचे काका रघुनाथराव ह्यांचे पेशवेपदासाठी प्रयत्न चालू होते. आपल्या हयातीतच माधवराव पेशवे यांनी रघुनाथरावांना शनिवारवाड्यात बदामी महालात कैदेत ठेवले होते. माधवराव पेशव...

बुऱ्हाणपुरची_लूट

Image
बुऱ्हाणपुरची_लूट   बुऱ्हाणपुरची_लूट ३० जानेवारी १६८१ स्वतःच्या राज्यभिषेकानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी दस्तुरखुद्द संभाजीराजांनी स्वतः आघाडीवर जाऊन मुघलांचे ऐश्वर्यसंपन्न असे ठाणे बुऱ्हाणपूर लुटले. तिथले सतराच्या सतरा पुरे लुटून उध्वस्त केले. त्या मग्रूर काकरखानला तुडव तुडव तुडवले. बुर् ‍ हाणपूर हे मोगल साम्राज्यात असणारे संपन्न ठिकाणांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी मराठ्यांचा खजिना भरण्यासाठी सुरतेची लूट करून औरंगेजबाने निर्माण केलेले सुरत शहर बदसुरत केले, त्याचप्रमाणे छत्रपती शंभुराजांनी बुर् ‍ हाणपूर जवळजवळ तीन दिवस लुटले. पण तत्पूर्वी संभाजीराजांनी आपण सुरत शहर पुन्हा लुटनार अशी आवई आपल्या हेरांमार्फत मुघलांच्या गोटात पसरवली. पण त्यांनी चाल केली मुघली सत्तेतील अत्यंत संपन्न असे शहर असणाऱ्या बुऱ्हाणपूर वरती. आता संभाजीराजे सुरत लुटनार अशी आवई तर पसरलीच होती. त्यात औरंगजेबचा दुधभाऊ खानजहाँ बहादूरखान कोकलताश हैबतजंग हा ९ जून १६८० पूर्वीच त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी औरंगाबादला जवळपास ३००० ची फौज जी बुऱ्हाणपूरच्या रक्षणासाठी होती ती फौज घेऊन गे...

राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत डबीर

Image
राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत डबीर   राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत डबीर २५ जानेवारी १६६५... शिवाजी महाराजांचे राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन... सोनोपंत डबीर म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील एक मौल्यवान रत्न.. मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली होती... सोनोपंत डबीर यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना सुनावलेले खड़े बोल...., जेव्हा शाहजीराजे आदिलशाहकड़े बंदी होते त्यांच्या सुटकेसाठी आदिलशाहने सिंहगड किल्ला परत मागितला होता तेव्हा छत्रपती शिवाजी राजे आपल्या पित्यावर रुष्ट झाले होते अणि तेव्हा सोनोपंत डबीर यांनी त्यांचा रुसवा काढताना..., “पराक्रमी राजलाच पृथ्वी वश होते राजे एक सिंहगड गेला म्हणुन तुम्ही पित्यावर रागावता, त्यापेक्षा एक गडाच्या बदल्यात आदिलशाहने शाहजीराजंसारख्या सिंहाला मुक्त केले आहे राजे आता तुम्ही पृथ्वीवर राज्य करा....” राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत डबीर ह्यांस विनम...