अदालत राजवाडा
अदालत राजवाडा अदालत राजवाडा पोस्टसांभार :: Nilesh Zore | ऐतिहासिक वाडे व गढी | नुसते नाव जरी ऐकले की आठवतात छत्रपती थोरले शाहू महाराज , आठवतात याच वाड्यात बसून न्यायदान करणारे थोरले छत्रपती प्रतापसिंह महाराज, आठवतात त्या, करारीपणे वावरणाऱ्या पण तिक्याच प्रेमळपणे जनतेला राजवाड्याची द्वारे खुल्या करणाऱ्या रयतेला पुत्रवत प्रेम करणाऱ्या राजमाता छत्रपती सुमित्राराजे भोसले. छत्रपती थोरले शाहू महाराजांनी जेव्हा किल्ले अजिंक्यतारा राजधानी म्हणून कमीपडू लागल्या नंतर राजधानी शाहूनगर (सातारा शहर) वसवले तेव्हा प्रथम काही वास्तू बांधल्या. सन १७२०/२१ मधील काही पत्रांमध्ये तसे उल्लेख आढळतात. शाहूनगर अर्थात सातारा शहर हे सुनियोजित शहर. शहर वसवताना किल्ले अजिंक्यतारा च्या माचीवर अर्थात अर्ध्या डोंगरावर बालेकिल्ल्या बांधला. मी बालेकिल्ला या साठी म्हणतोय कारण आपण जर अध्यास केला आणि नीट निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की नगरपालिका भागा पासून ते समर्थ मंदिर चौक इथं पर्यंत राजकारभारा निगडित वास्तू किंवा तत्सम इमारती किंवा त्यांच्या खाणाखुणा दिसतात. पण या माचीच्या अगदी मध्यभागी तख्तवाडा( सध्या...