#अपरिचित_शाहू_छत्रपती_महाराज #समस्त_ब्राह्मणांस_ताकीद_करुन_तुळजोभटास_पंगतीपावन_करणे छत्रपती शाहू महाराजांनी हे आज्ञापत्रं संताजी अटोळे यास लिहीलय या आज्ञापत्रात खालील हकीकत आली आहे. एका गोसाव्याने देऊळगाव येथील तुळजोभट ब्राह्मणाला भुलवून, भुरळ पाडून (मोहोन) ब्राह्मणास निषिद्ध कर्मात गुंतवून बाटविले... म्हणजे ब्राह्मणत्वा पासून पतित केले. त्यानंतर त्या तुळजोभटास पश्चात्ताप झाला आणि ब्राह्मणसभेत जाऊन त्यानं क्षमा मागितली व परत ब्राह्मण्यात घ्यावे ही विनंती केली तेव्हा समस्त ब्राह्मणसभेनं तुळजोभटास पंगतीपावन करुन प्रायश्चित्त दिले जावे अशी आज्ञा छत्रपतींनी दिली. पुढे घाटबेरी परगण्याच्या देशमुख व देशपांडे आणि तेथील समस्त ब्राह्मणास पण तुळजोभटास पंगतीपावन करुन प्रायश्चित्त द्यायची आज्ञा छत्रपती शाहू महाराजांनी केली आहे. तसेच पैठण ( जे तेव्हा ब्रह्मवृंदाचे केंद्र होते) तेथील पत्रास कोणी आडकाठी घेतली तर तशी आडकाठी कोणी घेऊ नये अशी आज्ञा केली आहे. छत्रपती शाहू महाराज हे प्रजा वत्सल राजे होते. एखाद्या इसमाकडून जर काही प्रमाद घडला तर त्याला योग्य प्रायश्चित्त देऊन पुन्हा सन्मार्गावर ...