तानाजी का तान्हाजी मालुसरे? योग्य माहिती आणि संदर्भ मिळेल का?

छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंह ; तानाजी मालुसरे

छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरच्या तहात म्हणजेच मिर्जाराजे जयसिंगासोबत झालेल्या तहात जेवढे किल्ले मुघलांना द्यावे लागले त्यापैकी एक होता, किल्ले कोंढाणा. माँसाहेब जिजाऊंना सर्वात प्रिय असणारा हा गड होता. मिर्जाराजे जयसिंगा बरोबर झालेल्या तहामुळे हा किल्ला माँसाहेबांना सोडून यावा लागला. या तहात ठरल्यानुसार आणि मिर्जा राजे जयसिंग यांच्या खास आग्रहा खातर छत्रपती शिवाजी महाराज आग्राला बादशाहच्या भेटीस जाण्यास राजी झाले होते.

कोंढाणा किल्ल्यावर आता मुघलांच्या फौजा होत्या, मिर्जाराजे जयसिंग यांनी नेमलेला त्यांचा सुभेदार उदयभान होता. हा मूळचा राजपूत, त्याचं मूळ नाव उदयसिंह राठोड. मुघलांची चाकरी करत असताना त्याने आपला हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला होता.

या उदयभान्यान कोंढाणा किल्ल्यावर जणान खाना सुरू केला होता. जिजाऊ माँसाहेबांना ही गोष्ट खपत नव्हती. त्यावेळी जिजाऊ माँसाहेब राजगडावर होत्या. राजे स्वराज्याच्या पहाणीवर गेले होते. जिजाऊ माँसाहेबांनी महादेव नावाच्या रामोशी मावळ्याला बोलावले आणि त्याला सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांना ताबडतोब जिथे असाल तिथून राजगडावर येण्यास सांगावे.” असा संदेश द्या.त्यावेळी महाराज रायगडावर होते. महादेवाचा संदेश मिळताच राजे जिजाऊ माँसाहेबाकडे आले. त्यावेळी माँसाहेबांनी आपली खंत शिवाजी महाराजांसमोर व्यक्त केली आणि शिवाजी राजाला सांगितलं की

“आम्हाला कोंढाणा परत हवाय.“

परंतु शिवाजी महाराजांना आताच मुघलांशी वैर घ्यायचं नव्हतं. परंतु जिजाऊ माँसाहेबांनी जेंव्हा कोंढाण्याची खरी परिस्थिती शिवाजी राजांना सांगितली तेंव्हा राजांची तळपायाची आग मस्तकात गेली. राजांनी कोंढाणा परत घेण्यात येईल, असं वचन माँसाहेबांना दिलं.

त्यावेळी तानाजी मालुसरे त्यांच्या मुलाच्या म्हणजेच रायबाच्या लग्नाच आमंत्रण घेऊन शिवाजी राजाकडे आले होते. त्यांना राजे कोंढाण्यावर चढाई करणार आहेत, ही गोष्ट कळली. त्यावेळी तानाजींनी आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी बाजूला ठेवली आणि कोंढण्यावर चढाई करण्याची तयारी सुरु केली. शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाशी बोलून तानाजी मालूसरे यांना कोंढण्याच्या चढाईला पाठवण्याचे निश्चित केले. त्यापद्धतीने शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे व अन्य मावळे यांच्यात बैठक झाली आणि छत्रपती शिवाजी राजांचा हा शूर मावळा मोहिमेच्या तयारीत जुटला.

सविस्तर माहिती - छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंह ; तानाजी मालुसरे - HeBaghBhau.Com

Comments

Popular posts from this blog

हिरोजी इंदलकर

सुभेदार थोरले मल्हारराव होळकर