हिरोजी इंदलकर

हिरोजी इंदलकर यांचा उल्लेख रायगड बांधणी,राज्याभिषेक पर्यंत येतो . तेथून पुढे त्यांचा इतिहासात उल्लेख येत नाही . त्यांचे वंशज कुठे आहेत सध्या. 
कृपया मार्गदर्शन करावे


_*श्री हिरोजी इंदुलकर"* (रायगड निर्माता)_ 

दुर्गज्ञान भाग पहिला दुर्गज्ञान 

*स्थापत्य अभियंता "श्री हिरोजी इंदुलकर" (रायगड निर्माता) असा (अभियंता) Engineer* जगात होणे नाही. आत्ताच्या कोणत्याही सिविल इंजिनिअर ला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते, की जो आपल्या उभारणीचा पुरावा देतो. आताही तो रायगड पाहायला भेटतो. असे फक्त शिवकाळात होऊ शकते, आणि त्या शिलालेख प्रमाणे आज ही रायगड पाहायला भेटतो.
जगदीश्वराच्या मंडपाबाहेर असलेला शिलालेख :-

।। श्री गणपतयेनमः ।।

।। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनु ।।
।। ज्ञया श्रीमछत्रपते शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः ।।
।। शाके षण्नव बाणभुमिगणनादानंद संवत्सरे ज्योतिराज ।।
।। मुहूर्त कीर्तिमहिते शुक्लेश सार्प्ये तिथौ ।। १ ।।

।। वापीकूपतडागराजिरू ।।
।। चिरं हर्म्येर्वनंवीथिको स्तंभैः कुंभिगृहैनरेंद्रसदनै ।।
।। र्मिहिते श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजीना निर्मितो ।।
।। यावच्चंद्र दिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।।

अर्थ :-

*सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद सिंहासनाधीश्वर श्रीमद् छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मधे आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या श्रीमद रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, घरे, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, उंच राजगृहे अशांची उभारणी केली आहे, ती चंद्रसूर्य असेपर्यंत नांदो*

ह्या जगातील सर्वश्रेष्ठ अभियंत्याने स्वताचे घर दार गहान ठेऊन रायगड बांधला. *मोबादला काय तर एका पायरीवर स्वताचे नाव लिहन्याची अनुमती मागितली. का तर राजांची चरण धूळ त्या नावावर अभिषेक करत राहील म्हणून,*

_*धन्य ते स्वराज्य अन् धन्य ते मावळे.*_
_*"श्री हिरोजी इंदुलकर" (रायगड निर्माता)*_

दुर्गज्ञान भाग दुसरा दुर्गज्ञान 

शिवाजी महाराजांकडे खूप निष्ठावंत माणसे होती. *हिरोजी इंदुलकर नावाचा बांधकाम प्रमुख शिवाजी महाराजांकडे होता. महाराजांनी रायगड किल्ला बांधायची जबाबदारी राज्यानी त्याच्यावर सोपावली.* शिवाजी महाराज स्वारी वर गेले. 
_*हिरोजीने किल्ला निम्यावर बांधत आणला आणि पैसा संपला हिरोजिला समजेणा काय करावे.. महाराजांनी तर जबाबदारी टाकली आहे. किल्ला तर पूर्ण केला पाहिजे.. तर पैसा शिल्लक नाही त्या हिरोजिने अपूर्ण काम केले. आपला राहता वाडा, आपली जमिन विकली. बायकोसह रायगडावर आला.. पैशासह जोपड़ी घेऊन राहू लागला आणि मराठयांची राजधानी बांधून काढली.*_

शिवाजी महाराजांना आल्यावर कळल हिरोजिने काय केले. राज्याभिषेकाच्या वेळी त्या शिवरायांना वाटले या हिरोजिंचा सत्कार करावा.

राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी म्हणाले, *"हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला, बोला तुम्हाला काय हवय.”* त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान झुकवून म्हणाले, _*"महाराज, उभ स्वराज्य तुम्ही पदरात टाकल, आम्हाला आणखी काय हवय...”*_ 

महाराज म्हणाले, "नाही काही तरी मागितलेच पाहिजे" त्यावेळी हिरोजी म्हणाला, 

*"महाराज एक विनंती आहे.. रायगडावर आम्ही जगदिशवराचे मंदिर उभारलं आहे. त्या जगदिशवराच्या एका पायरीवर आमच नाव कोरायची अनुमति आम्हाला दया".* 

_*महाराजांना कळेना हे कसलं मागणं.. पगार वाढ नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली, वतन नाही मागितल… मागुन मागितले तर काय दगडावर नाव कोरायची परवानगी महाराजानी विचारल हिरोंजी असं का…????*_

आणि _हिरोंजी उत्तर देतात, 
*"राजे.. ज्या ज्या वेळी रायगडावर असाल, त्या-त्या वेळी जगदिशवराच्या दर्शनाला तुम्ही याल, ज्या-ज्या वेळी दर्शनाला जाल, त्या-त्या वेळी तुमची पाऊल त्या पायारीवर पडत जातील… आणि महाराज त्यातल्याच जर एका पायरी वर माजे नाव कोरले असेल.. तर त्या-त्या वेळी तुमच्या पाऊलाची पायधूळ म्हणजे माज्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहिल...”*_ 

असे मावळे होते म्हणून स्वराज्य घडले........ 

मराठयानी इतिहास घडविला. *शिवरायांनी स्वराज्य उभे केले ते नेमके याच्याच बलावर*. विश्वास दिला राज्यानी _*"आपल राज्य उभा करायचा, मला छत्रपती व्हायच म्हणून नाही…. तमाम मराठयांच राज्य निर्माण करायचं, रयतेच राज्य गरीबांच राज्य तयार करायच आहे"*_ , ही काळजी इथल्या माणसा-माणसा मध्ये होती.
_*"श्री हिरोजी इंदुलकर" (रायगड निर्माता)*_ 

दु_*"श्री हिरोजी इंदुलकर" (रायगड निर्माता)*_ 

दुर्गज्ञान भाग शेवटचा दुर्गज्ञान 

प्रत्यक्षात महाराजांची अष्टकोनी समाधी बांधली तरी कोणी ?
याचा खुलासा शिवसाहित्यात आढळत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. *पण समाधीचे बांधकाम रायगडाची उभारणी करणारे हिरोजी इंदुलकर यांनी किंवा त्यांच्या हाताखाली गड-किल्ले उभारणीत निष्णात झालेल्या कारागिरांनीच ती उभारली असली पाहिजे असा कयास करता येतो.*

दूसरी शक्यता म्हणजे संभाजी राजे महाराजांच्या निधनानंतर साधारणपने पावणेदोन महिन्यानंतर रायगडावर आल्याचे छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ पृष्ठ ५३ वरून दिसते. 

_*पितानिधनानंतर त्यांच्या विरोधात रचलेला कट ज्याअर्थी उधळून लावला, त्याअर्थी महाराजांना ज्या ठिकाणी अग्नी दिला त्या ठिकाणी त्यांची समाधी उभारणे त्यांनी आपले इतिकर्तव्य मानून, त्यांनी समाधीची उभारणी केली असावी.*_ 

गड किल्ल्यांचे दिवंगत ज्येष्ठ इतिहासकार गो. नी. दांडेकर हे 'शिवतीर्थ रायगड' ग्रंथात पृ. क्रमांक ११२ वर 
*समाधीशेजारील ओवऱ्याचे बांधकाम संभाजी राजे यांनीच करून घेतल्याचे म्हणतात. जर महाराजांच्या समाधीशेजारील बांधकाम त्यांच्या हातचे असू शकते तर समाधीही संभाजी महाराजांनी बांधली असा सयुक्तित तर्क करता येतो.*

_*राहिला तर्क समाधीच्या अष्टकोनी आकृतीचा तर त्याबद्दल असे म्हणता येईल की संभाजी महाराज ऊर्दू, फारसी आणि संस्कृतचे गाढ़े विद्वान होते शिवाय ते संस्कृतमधुन काव्यरचना करीत असल्याने त्यांना सर्वपरिचित चौकोनी अथवा आयताकृती समाधीची कल्पना राबविण्याऐवजी ती अष्टकोनी असावी अशी कल्पना सूचणे व किल्ल्यांचे बांधकाम तज्ञ हिरोजी इंदुलकर व त्यांच्या सहकाऱ्यानी कृतीत उतरविणे सहजपणे शक्य वाटते.*_

दूसरे असे की, *सर्व ज्ञात घटना पाहता महाराजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारली जाणारी वास्तु अष्टकोनी असणे साहजिकही वाटते. महाराजांचे मंत्रिमंडळ अष्टप्रधानांचे होते. महाराजांची राजभद्राय... ही राजमुद्रा अष्टकोनी होती. त्याशिवाय महाराजांच्या सिंहासनाला जसे आठ सिंह कोरले होते तसेच सिंहासनाला खांबही आठच होते. या आठ आकड्यांचा असलेला संबंध समाधीच्या बांधकाम तज्ञांना ठाऊक असावा म्हणूनच महाराजांची समाधी अष्टकोनी उभारण्यात आली असावी असे वाटते.*

⛳🏇🏼⛳🏇🏼⛳🏇🏼⛳🏇🏼⛳

तर अशा प्रकारे *हिरोजी इंदुलकर* ह्यांच्या बद्दल अधिक माहिती देणारी आजची ही छोटेखानी सदर संपली

आपले अभिप्राय नक्की कळवा.

⛳🏇🏼⛳🏇🏼⛳🏇🏼⛳🏇🏼⛳


हे प्रकरण पुढील प्रमाणे आहे :-

गोपाळसेट सेटिया याच्यावर हिराजी इंदलकर याचे कर्ज होते (म्हणजे गोपाळसेट सेटिया याने हिराजी इंदलकर कडून कर्ज घेतले होते. ) कशासाठी कर्ज घेतले होते? ते पुढे सांगितले आहे. सबब की गोपाळसेट सेटिया व जाऊजी बाधा महाजन पेठमजकूर या हरदोजणांमध्ये सेटेपणा बद्दल करकशा लागला होता. (म्हणजेच गोपाळसेट सेटिया आणि जाऊजी बाधा महाजन या दोघांमध्ये सेटेपणाबद्दल भांडण लागले होते.) म्हणोन राजश्री स्वामीपासी मनसुभी होऊन सेटेपणास दूर झाला (म्हणजेच या भांडणाचा निवाडा छत्रपतींनी केला आणि त्यामध्ये गोपाळसेट सेटिया कडून हरकी घेतली, म्हणजेच त्याच्या बाजूने निकाल लागला ). गोपाळजी सेटिया यास १५० हरकी होन माथा ठेविले (म्हणजेच हरकीची रक्कम १५० होन होती) त्याचा वसूल द्यावयास हिरोजी इंदलकर सुभेदार माजी इमारत केले रायगड याचे कर्ज घेतले (म्हणजेच गोपाळजी सेटिया याने हरकीची रक्कम भरण्याकरिता त्याने हिरोजी इंदलकरांकडून कर्ज घेतले. ) होन १५५ ते देणे राहिले.(हरकीची रक्कम १५० होन असली तरी कर्ज घेताना त्याने हिरोजी कडून १५५ होन घेतले) त्यास हिरोजी इंदलकरास दस्त केले. (म्हणजे गोपाळजी हिरोजी इंदलकर याला १५५ होन देणे लागत होता, पुढील काळात हिरोजी इंदलकरास दस्त केले , म्हणजे कैद केले.) ते समई त्याचे कागद सापडले (म्हणजे हिरोजी इंदलकराला कैद केले त्यावेळी या संबंधीचे कागद इंदलकरांकडे सापडले ) 

हिरोजी इंदलकरांकडे जे कागद सापडले त्यावरून पुढील हकीगत समजली :-

१) गोपाळसेटीने हिरोजी इंदलकरांकडून १५५ होन कर्ज घेतले होते. 

२) त्यापैकी साडेपन्नास होन त्याने छ २६ रबिलाखर सन सीत सबैन ( व अलफ) रोजी म्हणजेच हिजरी सन १०७६, राबिलाखर महिन्याच्या २६ व्या दिवशी हिरोजीला दिले. (म्हणजेच यावेळी हिरोजी जिवंत होता !)

३) त्यानंतर गोपाळसेटीची कर्जपरतफेड करण्याची अवकात नसल्यामुळे ( "पुढे द्यावयास अवकात नाही" ) तो काही काळ परतोफेडीचा काही हप्ता देऊ शकला नाही. 

४) त्यानंतर "सन तीसा ता। इहिदे वसूल दिल्हे होन ४२" म्हणजे सन तीसा (सबैन अलफ) पासून सन इहिदे (समानीन अलफ) पर्यंत कर्जाच्या परतफेडी पोटी ४२ होन हिरोजीला दिले, याचा अर्थ असा की निदान इहिदे समानीन अलफ पर्यंत हिरोजीला कैद केलेले नव्हते आणि तो जिवंत होता. इहिदे समानीन अलफ हे वर्ष २४ मे १६८० सुरु होऊन २३ मे १६८१ ला संपलं . याचा अर्थ असा की निदान २४ मे १६८० पर्यंत हिरोजीला कैद केलेले नव्हते आणि तो जिवंत होता. 

या कर्जाच्या यापुढील हकीगतीशी तूर्त काही कर्तव्य नाही , म्हणून त्याचा तपशील देत नाही . इथे मुद्दा इतकाच आहे की २४ मे १६८० पर्यंत हिरोजी इंदलकरला कैद केलेले नव्हते आणि तो जिवंत होता. 

शिवाजी महाराज ३ एप्रिल १६८० रोजी मृत्यू पावले. वर दिलेल्या तपशिलावरून हे उघड आहे की शिवाजी महाराजांच्या हयातीत हिरोजीला कैदही केलेले नव्हते आणि तो मृत्यूही पावलेला नव्हता. त्याचे कैद होणे व त्याला मारले जाणे या गोष्टी शिवाजी महाराजांच्या हयातीत घडलेल्या नाहीत. घडल्याच असतील तर त्या शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर घडलेल्या आहेत.

इतिहास संकलक आप्पा परब माहित आहेत का त्यांच्या एका पुस्तकात हिरोजी फर्जद हाच हिरोजी इंदुलकर आहे हे सांगितले आहे, त्याला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पाया खाली दिला होताा.

Satish Kadam
शिवरायांनी हिरोजी इंदलकरला मारल्याचेपण उल्लेख आहेत... माझ्या पेजवर ओरिजनल पत्र आहे तपासा.

काही वडारांच्या देव्हाऱ्यावर त्यांच्या किल्ले बांधणीच्या योगदानाच्या संदर्भातील चित्र काढलेले असते.
कोकणात इंदुलकर आहेत,ते मराठा समज्याचे असून रायगडच्या परिसरात आहेत.... शोध घेऊ...

टेकवडी ता. पुरंधर जिल्हा पुणे हे गाव इंदलकरांचे आहे 70-75% ग्रामस्थांचे आडनाव इंदलकर आहे गावची लोकसंख्या तीन साडेतीन हजार आहे

इ स १६७६ साली शिवछत्रपतींनी आमच्या भोर तालुक्यातील "किकवी" गावच्या स्थानिकांना लिहिलेल्या पत्रात हिरोजींचा उल्लेख आला आहे.
ऐतिहासिक भोर या page वर लवकरच ते पाहायला मिळेल..

सातारा - मेढा रस्त्या दरम्यान कळंबे गावात इंदलकर आडनावाच्या लोकांचे गावात प्राबल्य आहे. 
ते स्वतः सरदार हिरोजी इंदुलकर यांचे वंशज असल्याचे अभिमानाने सांगतात. या गावाखेरीज इतर गावांत सुध्दा इंदलकर मंडळी भेटतात.

शिवापूर ला खोपी गावात इंदलकरांचे खूप जण राहतात

भूम तालुक्यातील वालवड गावात इंदलकर आहेत.


Comments

Popular posts from this blog

तानाजी का तान्हाजी मालुसरे? योग्य माहिती आणि संदर्भ मिळेल का?

सुभेदार थोरले मल्हारराव होळकर